नारायणगाव -कांदळी (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायत व गावातील सर्व डॉक्टरांच्या वतीने सुरू असलेल्या मोफत आरोग्य तपासणी दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांसाठी निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन रविवारी (दि. 12) करण्यात आले. या ठिकाणी अनेक रुग्ण येत असल्याने सरपंच विक्रम भोर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, गटविकास अधिकारी विकास दांगट, नायब तहसीलदार सचिन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सरपंच विक्रम भोर, मंगेश काकडे, सत्यवान काकडे, उपसरपंच सुदर्शन बढे, ग्रामविकास अधिकारी रंजना ठोकळ, अनिल भोर, सचिन रोकडे, गणपत गुंजाळ, सुरेश कुतळ, मनोज फुलसुंदर, अक्षदा भोर, डॉ. राजेश राजदेव, डॉ. गणेश देवरे, डॉ. प्रशांत सोमवंशी, डॉ. अविनाश पोथकर आदी उपस्थित होते.