जळोची, दि. 15 (वार्ताहर) -बारामती तालुक्यामध्ये करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, बांधकाम विभाग पुणे मंडळ अतुल चव्हाण,
बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, माजी आरोग्य सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव उपस्थित होते.