करोना बाधितांना मिळतंय आंबरस पुरीचे मिष्टान्न भोजन!

बेलसर -पुरंदर तालुक्‍यात उभारण्यात आलेल्या सर्व कोविड सेंटरमधील करोनाबाधितांना अक्षयतृतीया निमित्त आंबारसाचे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

जेजुरी येथील सुवर्णस्टार स्पोर्टस आणि सोशल क्‍लब ने अक्षयतृतीये निमित्त आंबरस, पुरी, भाजी, वरण, भात, कुरडई, पापडचे मिष्टान्न भोजनाचे अतिशय स्वच्छ पॅकिंगमध्ये पॅकेट बाधितांना वितरण करण्यात आले.

खळद ग्रामीण संस्था संचलित आनंदी जम्बो कोविड सेंटर खळद येथे बाधित, मेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि पुढच्या फळीत काम करणाऱ्या सगळ्या सेवकांनाही हे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

यावेळी सुवर्णस्टार क्‍लबचे बाळासाहेब दरेकर, अमोल बेलसरे, शेखर बारभाई, विजय वाघमारे, गणेश म्हेत्रे, ग्रामीण संस्था संचालक मुन्ना शिंदे, बाळासाहेब कड, युवानेते सागर मोकाशी, शिक्षकनेते संदीप जगताप उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.