वेल्हे – करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यपणे सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी वेल्हे तालुक्यात मेंगाई मंदिर वेल्हे बुद्रुक, साखर आणि पानशेत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा तीन ठिकाणी “फ्लू क्लिनिक’ सुरू करण्यात आली आहेत.
या तीनही “फ्लू क्लिनिक’वर स्थानिक खासगी डॉक्टर डॉ. जितेंद्र जाधव व डॉ. नलिनी जाधव नागरिकांच्या सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 11.30 या वेळेत विनामूल्य सेवा बजावत आहेत. या क्लिनिकमध्ये केवळ सर्दी, ताप व खोकला याच आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
या व्यतिरिक्त इतर आजारांची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार नाही. सकाळी दीड तास होणाऱ्या या वैद्यकीय सेवेचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.