कोलकाता – पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे महिलांवरील अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या तक्रारींची नोंद करण्यासाठी सीबीआयनेएस्वतंत्र ईमेल आयडी सुरू केला असून त्यावर संबंधीतांनी आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, अशी सुचना सीबीआयतर्फे करण्यात आली आहे.
१० एप्रिल २०२४ रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने, सीबीआयने हा स्वतंत्र ईमेल तयार केला आहे ज्यामध्ये संदेशखळीच्या महिलांवरील गुन्ह्यांबाबत आणि जमीन बळजबरीने बळकावण्याच्या प्रकाराबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात,असे सीबीआयने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या ईमेलची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी जिल्हादंडाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
येथे तृणमुल कॉंग्रेसच्या एका नेत्याने व त्याच्या कार्यकर्त्यांनी मोठी दहशत माजवून महिलांवर अत्याचार केले तसेच अनेकांच्या मालमत्ता बळकावण्याचा प्रकार घडला आहे, पण दहशतीमुळे कोणीही तक्रारी देण्यासाठी पुढे येत नाही असे सीबीआयचे म्हणणे आहे.