पुणे – सध्या सुरू असलेल्या आयुष्मान भारत मोहिमेत, एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत आतापर्यंत पाच कोटींवर नागरिकांचे आभा- AABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट तयार करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, एकूण चार कोटी ४४ लाख ९२ हजार ५६४ आयुष्मान कार्ड तयार केली गेली आहेत आणि तसेच यानिमित्ताने २८ डिसेंबरपर्यंत एक लाख १५ हजार ९२३ आयुष्मान सभा आयोजित करण्यात आल्या.
सध्या सुरू असलेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावे आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावे यांची एकत्रित संख्या दिनांक २८ डिसेंबर पर्यंत १३ लाख ८४ हजार ३०९ इतकी असून या आरोग्य मेळाव्यांना भेट देणाऱ्यांची संख्या ११ कोटी ३० लाख ९८ हजार १० पर्यंत पोहोचली आहे.
आरोग्य मेळाव्यात आरोग्य मंदिर योजना राबवली जाते. या योजनेद्वारे १३ लाख ४९ हजार ३५६ मेळावे यशस्वीरित्या आयोजित केले असून त्यांना एकूण नऊ कोटी ७६ लाख ५६ हजार ६० नागरिकांनी भेट दिली आहे. या मेळ्यांमध्ये नऊ लाख २१ हजार ७८३ निरोगी स्वास्थ्य, योग, ध्यान यासह एकूण एक कोटी दोन लाख ९० हजार ३४५ जणांसाठी दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्लामसलत करण्यात आली. सहा कोटी ४१ लाख ७० हजार २९७ लोकांना मोफत औषधे आणि पाच कोटी १० लाख ४८ हजार ६४४ लोकांना मोफत रुग्णनिदान सेवा मिळाली आहे.
७४ लाख चार हजार ३५६ लोकांना आयुष सेवा मिळाली आणि १० कोटी ९९ लाख ६३ हजार ८९१ लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक बदल याविषयी समुपदेशन करण्यात आले. गरोदरपणातील पहिल्या तिमाहीत असलेल्या ४५ लाख ४३ हजार ७०५ मातांनी या मेळाव्यांत नोंदणी केली आणि प्रथमच त्यांच्या रक्तातील संपूर्ण न्यूट्रोफिल काउंट (प्रसूतीपूर्व ANC) तपासणी पूर्ण केली तसेच २९ लाख ८३ हजार ५६५ माता आणि ४९ लाख ४४ हजार ३५९ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. १८ कोटी ९४ लाख ७१ हजार ४९० नागरिकांच्या सात प्रकारच्या प्राथमिक तपासण्या (स्क्रीनिंग -क्षय , उच्च रक्तदाब, मधुमेह, मुखकर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मोतीबिंदू) तपासणी करण्यात आल्या.