बारामती – जागेच्या मोबदल्यात बारामती नगर परिषदेने ४ हजार चौरस मीटरचे बारामतीच्या इतिहासातले पहिले टीडीआर सर्टिफिकेट मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते जागा मालकांना आदा केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने बारामती शहराचा विकास जोमाने होत आहे.याच कारणास्तव बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील विविध कामांकरिता काही जागा आरक्षित केल्या आहेत.
त्यापैकी बारामती हद्दीतील गट नंबर २४९ येथील अनुक्रमे मनोज पोतेकर, किशोर जोशी, निशांत मेहता यांनी त्यांच्या मालकीची जागा बारामती नगरपरिषदेस हस्तांतर केली. या जागेच्या मोबदल्यात बारामती नगर परिषदेने ४हजार चौरस मीटरचे बारामतीतील पहिले टीडीआर सर्टिफिकेट (दि. ११) रोजी जागा मालकांना नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते अदा करण्यात आले.
याप्रसंगी नगररचनाकार अवताडे, साळी, अमोल गोफणे व प्रशासनाने सहकार्य केले .तसेच बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव स्थापत्य विशारद जयंत किकले यांनी भरीव सहकार्य केले.