प्रथम सत्र परीक्षेबाबत आज निर्णय होणार?

परीक्षा मंडळाची बैठक; वेळापत्रक, एजन्सी निवडीवर होणार चर्चा

 

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा कधी होतील, याविषयी काहीच स्पष्टता नाही. परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय हा परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला जातो. त्यादृष्टीने महत्त्वाची असणारी ही बैठक मंगळवारी (दि.9) होत आहे. त्यामुळे परीक्षेबाबत ठोस निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठाच्या नियोजित वेळापत्रकानुसार येत्या सोमवारपासून प्रथम सत्राची परीक्षा होणार आहे. मात्र, या परीक्षेसाठी नेमावयाची एजन्सीचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आठवभरात सुरू होणारी ही परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा एजन्सीमार्फत घ्यावे लागणार आहे. ती एजन्सीच अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे ही परीक्षा कधी सुरू होणार आहे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे पडला आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षा सध्या अस्तित्वास असलेल्या एजन्सी अथवा नव्या एजन्सीद्वारे घ्यायचा, त्यावरून परीक्षेचा निर्णय प्रलंबित राहिला आहे. एजन्सीचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा अन्‌ परीक्षा वेळेवर घ्या, अशी मागणी पालकांतून होत आहे. योग्य कंपनीची निवड करून तांत्रिक अडचणीविना ही परीक्षा पार पाडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली आहे.

विद्यापीठ मौनावस्थेत
सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. अशा स्थितीत विद्यार्थी केंद्रित म्हणून काम करणारे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांना परीक्षेच्या संदर्भात ठोस निर्णय घेण्यास इतका वेळ का लागतो? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत असताना विद्यापीठ मात्र मौनावस्थेत असल्याची टीका शिक्षणक्षेत्रातून होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.