Tennis | सहा भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक, निधी चिलूमुला, आरती मुनियन, अलीन कोमर फरहात, श्राव्या चिलकलापुडी, श्रेया तातावर्ती या सहा भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात तिसऱ्या मानांकित सोहा सादिकने सातव्या मानांकित प्रत्युशा रचापुडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नवव्या मानांकित आरती मुनियन व पाचव्या मानांकित निधी चिलूमुला यांनी अनुक्रमे यशिका वेणू व सोनाशी भटनागर यांचा 6-1, 6-1 अशा सारख्याच फरकाने पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

आठव्या मानांकित श्रेया तातावर्तीने काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या तेजस्वी काटेचा 6-3, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. अलीन कोमर फरहातने राधिका यादवचा 6-1, 6-0 असा, तर दुसऱ्या मानांकित श्राव्या शिवानी चिलकलापुडीने रेनी सिंगलाचा 6-1, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.