मुंबई – शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआय या वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलंय. यांनतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरव्दारे व्हिडीओ पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे की, बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
नाव आणि पैसा
पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो….
पण एकदा का नाव गेलं कि परत येत नाही.
ते येऊ शकत नाही.
काळ्या बाजारात सुध्दा मिळायचं नाही.
म्हणून नावाला जपा.
नाव मोठं करा.
– बाळ ठाकरे
अशाप्रकारे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओरूपी संदेश देणारा व्हिडीओ पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.