पिंपरी, दि. 17 : – भारतीय जनता पक्ष देशात धार्मिक आणि जातीय राजकारण करत आहेत. देशात आर्थिक विषमता वाढत आहेत असून त्यामुळे धार्मिक आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई, स्वातंत्र्यानंतर उच्चांकी पहिल्यांदाच वाढलेली बेरोजगारी हे देशासमोर भीषण प्रश्न असताना भाजप मात्र धर्माच्या आणि मंदिराच्या नावाने राजकारण करत आहे, त्यामुळे परिवर्तन घडणे ही काळाची गरज बनली आहे. परिवर्तनाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक व पुरोगामी चळवळीतील तब्बल 40 संघटनांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पुरोगामी पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाना काटे यांना पाठींबा जाहीर केला. त्याप्रसंगी रहाटणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मानव कांबळे बोलत होते.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुंभे यांच्यासह नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, कामगार संघटनेचे डॉ. सुरेश बेरी यांच्यासह धनाजी येळकर पाटील, सचिन आल्हाट, सतीश काळे, गणेश दराडे, प्रकाश जाधव, अमीन शेख, अपर्णा दराडे, युवराज बाळासाहेब पवार, अशोक मिरगे, कॉ माधव रोहम, प्रल्हाद कांबळे, अरविंद जक्का, शैलेश गाडे, लता भिसे, शिवशंकर उबाळे, विशाल कसबे, सचिन भाऊ सकाटे, हरिभाऊ वाघमारे, अभिजीत भालेराव, चेतन वाघमारे, शांताराम खुडे, सचिन बगाडे, गिरीश साबळे, बाबासाहेब चव्हाण, प्रदिप पवार, राजेश माने, आशिष शिंदे, लालासाहेब गायकवाड, दिलीप काकडे, डॉ, कॉ . बी.टी . देशमुख, सिद्धेश्वर, तानाजी हराळे, चंद्रकांत क्षीरसागर, अनंत व्हंडरने, नकुल भोईर, संतोष वाघे व इतर मान्यवर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.