विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या बहुप्रतिक्षित ऍक्शन सिनेमाला अखेर शिर्षक मिळाले आहे. या सिनेमाचे नाव “लिगेर’ असे असणार आहे. रविवारी या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. हा सिनेमा म्हणजे “पॅन इंडिया देशव्यापी मॅडनेसची गॅरंटी’ असेल असे विजय देवराकोंडाने ट्विटरवर म्हटले आहे.
View this post on Instagram
रम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली, मकरंद देशपांडे आणि गेटअप श्रीनु हे धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. पुरी जगन्नाथचे टुरिंग टॉकिज आणि पुरी कनेक्टस हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. पुरी जगन्नाथ हेच या सिनेमाचे दिग्दर्शक असणार आहेत.
View this post on Instagram
हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये हा सिनेमा एकाचवेळी बनवला जाणार आहे. करण जोहरने देखील या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. विजय देवराकोंडा हा बॉक्सिंग ग्लोव्हज घालून प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवत असतानाचे भीतीदायक दृश्य या पोस्टरमध्ये दिसते आहे. लॉकडाऊनच्या आगोदरच विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडेने या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली होती. तेंव्हा या सिनेमाचे शिर्षक “फायटर’ असे निश्चित केले गेले होते. या सिनेमातून अनन्या तेलगूमध्ये पदार्पण करत आहे.