Ram mandir ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिराचे भव्य बांधकामाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता आणखी काही फोटो समोर आले आहोत. राम मंदिराला पहिला सोन्याचा दरवाजा बसवण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या तीन दिवसांत आणखी 13 सोन्याचे दरवाजे येथे बसवले जाणार आहेत.
गर्भगृहाच्या मुख्य दरवाजांचे पूजन पूर्ण झाले असून गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजांचे काम सुरू आहे. हत्ती, कमळ, उत्कृष्ट डिझाईन्स त्याला भव्यता देत आहेत.
The first gold door has been installed in Shri Ram Temple, 13 more such doors will be installed in the next three days.
Retweet with pride . pic.twitter.com/vi9tZzNyQh
— Aquib Mir (@aquibmir71) January 9, 2024
हैदराबादची कंपनी बनवत आहे दरवाजे –
हैदराबादची 100 वर्षे जुनी कंपनी अनुराधा टिंबर राम मंदिराचे लाकडी दरवाजे तयार करत आहे. हे दरवाजे अयोध्येत तात्पुरत्या कार्यशाळेत बनवले जात आहेत. नागर शैलीतील बांधकामाची झलक दरवाजांवर स्पष्टपणे दिसते. मंदिराचा दरवाजा सोन्याने मढवला आहे.
शुभचिन्हे कोरली –
दरवाजाच्या कार्यशाळेत काम करणारे शेखर दास म्हणाले की, दरवाजे भव्यता प्रतिबिंबित करण्यासाठी त्यांच्या डिझाइनमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय हिंदू धर्मात शुभ प्रतिक मानली जाणारी चिन्हेही या दरवाजांवर कोरण्यात आली आहेत. तामिळनाडूतील कारागीर अयोध्येत लाकडी दरवाजे कोरण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.
Gate No. 11, Shri Ram Mandir, Ayodhya
13 more such gold doors to be installed in next 3 days.
Jai Shri Ram 🚩 pic.twitter.com/fIKgLzQApm
— The Uttar Pradesh Index (@theupindex) January 9, 2024
या शहरांशी हवाई संपर्क –
प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देश-विदेशातून आठ हजारांहून अधिक पाहुणे येणार आहेत. त्यासाठी अयोध्या विमानतळावर मोठा ताण पडणार आहे. व्यावसायिक उड्डाणांव्यतिरिक्त, सुमारे 40 चार्टर्ड विमानांना उतरण्यासाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे, सध्या अयोध्या विमानतळावर आठ शहरांशी कनेक्टिव्हिटी सुरू झाली आहे.
या शहरांमध्ये लखनौ, दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा यांचा समावेश आहे. सध्या इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस सारख्या कंपन्यांनी त्यांची उड्डाणे सुरू केली आहेत, तर आकासा एअरही लवकरच अयोध्येतून आपले कार्य सुरू करणार आहे.