पिंपरी चिंचवड : निगडीतील कृष्णमंदीरामागे एक बगळा झाडावर अडकला असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर 45 फूट उंचीवर असलेल्या जखमी बगळ्याची सुखरुप सुटका केली आहे. पतंगाचा मांजा पायात अडकल्याने हा बगळा झाडावर अडकला होता.
अग्निशामक दलाने या बगळ्याची सुटका केल्यानंतर त्याला शाहूनगरच्या बहिणाबाई उद्यानामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.