पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लष्कर परिसरातील क्लोवर सेंटरमध्ये चप्पलच्या दुकानाला आग लागली. यात दुकान खाक झाले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी २३ मिनिटांत आग आटोक्यात आणली. तसेच इमारतीतील रहिवाशांना वेळेत बाहेर काढल्याने मोठा धोका टळला.
या आगीची माहिती पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. यानंतर भवानी पेठ आणि कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे २ बंब आणि १ वॉटर टँकर रवाना झाले. याच बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर काही कुटूंब वास्तव्यास आहेत. त्या नागरिकांना पार्किंगमध्ये सुरक्षित नेण्यात आले. दऱम्यान, जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. ही कामगिरी अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, मंगेश मिळवणे, नवले, मोहिते यांच्या पथकाने केली.
सोमवार पेठेतही आग
सोमवार पेठ, समर्थ पोलीस स्टेशनजवळ, एम्प्लॉयमेंट ऑफिस आवारामध्ये असलेल्या एका चारचाकी वाहनाला मध्यरात्री आग लागली होती. अग्निशमन दलने पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली.