वाघोलीत “आधार’साठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा

सहाय्यक अधीक्षक सुदाम साबळे यांचे “आधार कॅम्प’ घेण्याचे आवश्‍वासन

वाघोली- येथील पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असलेल्या आधार कार्ड नोंदणीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे पोस्ट ग्रामीण अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वाघोलीत महिन्यातून एकदा आधार कार्ड कॅम्प घेणार असल्याचे सहाय्यक अधीक्षक सुदाम साबळे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत वाघोलीची लोकसंख्या कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील पोस्ट ऑफीसमध्ये आधार कार्डचे मशीन चालू असून या ठिकाणी आठवड्यातून एक वेळा म्हणजे फक्त मंगळवारी आधार कार्डचे काम करण्यात येते, मात्र, अनेक नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये रोज येऊन जातात. हे काम रोज चालू नसल्याने नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आधार कार्डसाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र खोलीची व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र कर्मचारी नसल्याने कामाला गती येत नाही, त्यामुळे वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांना आधार कार्डची सुविधा मिळण्यासाठी वाघोली येथील पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

  • पोस्टामध्ये आधार कार्डसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि वाघोलीची लोकसंख्या पाहता या महिन्याच्या अखेरीस आधारकार्ड कॅम्प घेणार आहोत, तसेच पुढील नियमित कॅम्पचे देखील नियोजन केले जाईल. – एस. आर. साबळे, सहायक अधीक्षक, पुमे

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×