मुंबई – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आयुष्यावरील संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर होता. या टोळीने सलमानला आपले टार्गेट बनवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.
सलमान खानला पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. त्याच्या मॅनेजरला धमकीचा ईमेल आला असून त्यात गोल्डी ब्रारच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत. लवकरच सलमान खानला जीवे मारून , असे सांगण्यात आले. ‘गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी म्हणजेच सलमान खानशी बोलायचे आहे. याप्रकरणी अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंग मेंबर सलमान झाला का देतोय धमकी
लॉरेन्स बिश्नोई इतका चिडला का? तो सलमान खानला का टार्गेट करतोय? सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाचं उत्तर आहे. कारण लॉरेन्स हा बिष्णोई समाजातील आहे. त्यामुळे काळवीट प्रकरणी सलमान खानला आरोपी बनवल्यावर गुंड संतापला. या प्रकरणामुळे बिश्नोई टोळी सलमानच्या मागे लागली असून त्यांना या अभिनेत्याला धडा शिकवायचा आहे. त्यामुळेच त्याने अनेकवेळा अभिनेत्याला मारण्याची योजना आखली आहे. ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही लॉरेन्सने हल्ल्याची योजना आखली होती, पण तो अयशस्वी ठरला.