नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी काल मंगळवारी मंड्याता आयोजित एका रॅलीत लोकांच्या अंगांवर पैशांचा पाऊस केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवकुमार यांनी रॅलीतील लोकांवर ५०० रुपयांच्या नोटा फिरवल्या असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.
श्रीरंगपटना येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रजा ध्वनी यात्रेत शिवकुमार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बसमधून कलाकारांवर पैशांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. डी.के.शिवकुमार हे यापूर्वी देखील वादात अडकले होते,
#WATCH | Karnataka Congress Chief DK Shivakumar was seen throwing Rs 500 currency notes on the artists near Bevinahalli in Mandya district during the ‘Praja Dhwani Yatra’ organized by Congress in Srirangapatna. (28.03) pic.twitter.com/aF2Lf0pksi
— ANI (@ANI) March 29, 2023
काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रवीण हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला होता.
एवढंच नाही आर आपल्या पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवकुमार यांनी दिला होता. काँग्रेस नेत्याने प्रवीण यांच्यावर नांजे गौडा आणि उरी गौडा यांच्या नावाने प्रवेशद्वार बनवण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला होता. हिंदू कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नांजे आणि उरी यांनी म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची हत्या केली.