नवी दिल्ली – भारतीय निवडणूक आयोगाकडून आज कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. विधानसभेच्या 224 जागांवर यावेळी निवडणूक होणार आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटक राज्यात 5.21 कोटी मतदार आहेत. ज्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २.६ कोटी, तर महिला मतदारांची संख्या २.५ कोटी आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 80 जागा, जेडीएसला 37 जागा आणि भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटकात 58,282 मतदान केंद्रे आहेत, त्यापैकी 20,866 शहरी केंद्रे आहेत. यापैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर म्हणजेच 29,140 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
First-time voters have increased from 2018-19 by 9.17 lakhs in Karnataka. All young voters who are turning 18 years of age by April 1, will be able to vote in Karnataka Assembly elections: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/fNlVxVcta6
— ANI (@ANI) March 29, 2023
कर्नाटकात 2018-19 पासून 9.17 लाख इतकी पहिल्यांदा मतदारांची वाढ झाली आहे. 1 एप्रिलपर्यंतचे 18 वर्षांचे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत.