-->

मुंबईतील ट्राफिक जाममध्ये पठ्ठ्याने शोधली व्यवसायाची संधी; महिन्याला कमावतोय २ लाख

मुंबई – नौकरीच्या ‘झंझटीतुन’ मुक्त होऊन आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा हे आजच्या तरुणाईचं ड्रीम बनलंय. मात्र आपल्या स्वप्नांना मेहनतीचं पाठबळ न दिल्याने अनेकांचं हे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहत. व्यवसायाचं स्वप्न पूर्ण न झाल्यास गाठीशी पुरेसा अनुभव नाही, भांडवल नाही अशा सबबी देणारे अनेक असतात.

मात्र निवडलेल्या व्यवसायात पूर्णपणे झोकून देऊन यशाचं शिखर गाठणारे मोजकेच. आज आपण स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवलेल्या एका तरुणाची वाटचाल जाणून घेणार आहोत…

अनेकांसाठी ‘अनलकी’ ठरलेलं २०२० ‘या’ मजुरासाठी ठरलं ‘सुपर’ लकी; झटक्यात मिळाले २.५ कोटी

ही कहाणी आहे मुंबईतील गौरव लोंढे या तरुणाची. २००९मध्ये मुंबई महानगरामध्ये गौरव पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सायंकाळी ५.३०-६ च्या दरम्यान त्याची सुट्टी होत असे. त्यावेळी, रस्त्यांवर वाहनांची तुडुंब गर्दी होत असल्याने गौरवला अंधेरीपासून २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या घरी पोहचण्यास तब्बल ३ तास लागत असत.

जेव्हा केव्हा गौरव ‘ट्राफिक जाम’मध्ये अडकत असे तेव्हा तेव्हा त्याच्या मनाला ‘काही तरी खायला मिळालं तर बरं झालं असतं’ असा विचार स्पर्शून जायचा. २०१९मध्ये गौरव एकदा अश्याच ट्राफिक जाममध्ये अडकला असताना, ‘ज्या प्रमाणे आपल्याला ट्राफिक जाममध्ये भूक लागते तशी इतरांनाही लागत असेलच ना’ असा विचार आला अन् वाहनांच्या गर्दीतच त्याला आपला वेगळा मार्ग सापडला.

गौरवने ट्राफिक जाममध्ये अडकलेल्यांना वडापाव विकण्याची शक्कल लढवली. घरी आई चांगला वडापाव बनवते, आपल्यालाही फूड-डिलिव्हरी क्षेत्रातला चांगला अनुभव आहे, हे वेळीच ओळखून गौरवने स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. वडापावसोबतच त्याने एक चांगलं पॅकिंग, त्यात हात व तोंड पुसण्यासाठी टिश्यू व एक छोटी पाणी बॉटल असं पॅकेज तयार केलं. तेही सामान्यांना परवडेल अशा २० रुपये इतक्या कमी किंमतीत.

व्यवसायात पडण्यापूर्वी गौरवने ‘लोकांनाही भूक लागत असेल’ हा अंदाज खरा ठरला अन् आर्थिक राजधानीत वाहनांच्या गर्दीतून गौरवच्या व्यवसायाची गाडी वेगाने धावू लागली. कधीकाळी पिझ्झा डिलेव्हरी बॉयची नौकरी करणारा गौरव आज महिन्याला २ लाख कमावतोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.