अजानच्या आवाजाने आरोह वेलणकर वैतागला; व्हिडिओ शेअर करून म्हणाला…

मुंबई – धार्मिक विधींमुळे अडचणींचा सामना करावा लागतो, अशी ओरड नेहमीच होते. खास करून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांकडून यावर प्रमुख्याने नाराजी व्यक्त करण्यात येते. गायक सोनू निगम याच्यानंतर आता छोट्या पडद्यावरील एका मालिकेतील कलाकार आरोह वेलणकर यांनी अजानमुळे होत असलेला त्रास सोशल मीडियावर बोलून दाखवला आहे.

आरोहने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पठाणवाडीतील घरातून आरोहने हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत अजानचा आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे. काय करायचं ह्याचं? असा सवाल त्याने केला आहे. आरोहने शेअर केलेला व्हिडिओ मुंबई पोलीस, महानगरपालिका, आदित्य ठाकरे, मुख्यामंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग केला आहे.

पहाटेचे सहा वाजले आहेत आणि अजानचा किती मोठा आवाज येतोय, हे तुम्हीही ऐकू शकता. मी अडीच वर्षांपासून इथे राहतोय आणि हे रोजचे आहे. दिवसातून पाच वेळा अजान होते. मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मशिदीतून येणा-या अजानच्या आवाजाबद्दल लिहिले होते. दोन दिवसांपूर्वीच मी याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारीनंतर दोन दिवस बंद झाले होते. पण आता पुन्हा सुरु झालेय. मला तरी काय करायचे कळत नाहीये. आता तुम्हीच सांगा मी काय करू? असा सवाल आरोहने या व्हिडीओत केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.