अमिताभ बच्चन, अक्षय कुमारवरून राजकारण तापले; पटोले-फडणवीस आमने-सामने

भंडारा : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. भंडारा येथे बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आला आहे.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कलाकारांच्या शुटींगवर गदा आणण्याचे वक्तव्य करणे म्हणजे नाना पटोले यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. कलाकारांचे शुटींग तुम्ही कसकाय रोखू शकता, असा सवाल करत फडणवीसांनी देशात कायदा आणि सुव्यवस्था असल्याचे म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात या कलाकारांनी भूमिका मांडावी, असंही नाना पटोले म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.