पुणे – बंगालच्या उपसागरात आलेल्या अमफन चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मान्सून आज दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. सध्या या भागात ढगांची दाटी झाली असून जोरदार पाऊस कोसळत आहे.
या वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक हवामान निर्माण झाल्याने येत्या मंगळवार (19 मे) पर्यंत अंदमानमधील इतर बेटांवरसुद्धा मान्सून दाखल होणार अखेर मान्सून अंदमानात दाखल
असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या नवीन दिर्घकालीन अनुमानानूसार मान्सून 22 मे पर्यत संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. आज मान्सून दक्षिण भागात दाखल झाला असून मजल दरमजल करत त्याची उत्तरेकडे वाटचाल होणार आहे. नियमित वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी 18 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात आला होता.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील अमफन चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टी पासून 190 तर पश्चिमबंगालच्या किनारपट्टीपासून 1100 किलोमीटर दक्षिणकडे आहे. ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने चक्रावारे वाहत असलेल्या या वादळाचे केंद्र उत्तरेकडे सरकत आहे. येत्या बारा तासात चक्रीवादळ अतीतीव्र होण्याची शक्यता असून त्याची तिव्रता आणखी वाढणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र काही काळ उत्तरेकडे सरकणार असून नंतर ते पश्चिम बंगाल व बांग्लादेश किनाऱ्यावर धडकणार आहे.
चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीवरही प्रभाव पडणार असून अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.केरळात मात्र मान्सून पाच जूनच्या आसपासच दाखल होईल.