मुंबई – आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘शाबाश मिट्ठू’च्या पोस्टरमुळे चर्चेत आहे. ‘शाबाश मिट्ठू’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून या पोस्टरमध्ये तापसी बॅटिंग करण्याच्या अंदाजात दिसत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात भारतीय महिला क्रिकेट संघाला उजितावस्था मिळवून देणाऱ्या मिताली राजची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. मिताली राजच्या आयुष्यातील उतार चढाव, तिला मिळालेले सेटबॅक आणि तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही यामध्ये बघायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
‘शाबाश मिट्ठू’ हा बायोपिक १५ जुलै २०२२ ला रिलीज होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला उजितावस्था मिळवून देणाऱ्या मिताली राजची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. मिताली राजच्या आयुष्यातील उतार चढाव, तिला मिळालेले सेटबॅक आणि तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही यामध्ये बघायला मिळणार आहेत. आता तापसी पन्नूला “शाबास मिथू’च्या रुपाने आणखीन एक स्पोर्टस बायोपिक मिळाला आहे. “शाबास मिथू’मध्ये तिच्याशिवाय अन्य मुख्य भूमिकेत विजय राज देखील दिसणार आहे. ‘शाबाश मिठू’चे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे.