नवी दिल्ली – जलशुद्धीकरण क्षेत्रातील केंट आरओ कंपनीने आपल्या अट्टा अँड ब्रेड मेकर या उत्पादनाची जाहिरात घरगुती काम करणाऱ्या महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीने केल्यामुळे या कंपनीवर नेटकऱ्यानी तुफान टोलेबाजी केली त्यानंतर या कंपनीने माफी मागून ही जाहिरात परत घेतली आहे.
या कंपनीच्या जाहिरातीमध्ये हेमा मालिनी आणि त्यांची कन्या ईशा देवल यांचा सहभाग होता. घरगुती काम करणाऱ्या महिलांनी पीठ हाताळल्यास ग्राहकाच्या आरोग्यावर परिणाम परिणाम होईल. या महिलांच्या हातांना संसर्ग झालेला असू शकतो, असे जाहीरातीत सूचीत केले होते.
केंटची ही जाहिरात नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. केंट कंपनीने अगोदर आपल्या विचाराचे शुद्धीकरण करावे असा हल्ला करून काही नेटकऱ्यानी केंटच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. केंट कंपनीला काही दुषित हृदयांचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे केंट कंपनीला मानसिक उपचाराची गरज असल्याचे काही नेटकऱ्यानी सांगितले.
तसेच घरगुती काम करणाऱ्या महिलांचा अवमान हा एकूणच महिलाविरोधी असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. नेटकऱ्याच्या या तुफान हल्ल्यानंतर केंट कंपनीचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी माफी मागून ही जाहिरात परत घेत असल्याचे सांगितले. मुळात ही जाहिरात आमच्या धोरणाशी विसंगत होती. ती कशी बाहेर आली याची आम्ही चौकशी करीत आहोत असे गुप्ता यांचे म्हणणे आहे.
Please accept our sincere apologies for having published the Ad of Kent Atta & Bread Maker. It was unintentional but wrongly communicated and it has been withdrawn. We support and respect all sections of the society.
Mahesh Gupta, Chairman
— Kent RO (@KentROSystems) May 27, 2020
I hope they realise that it was ” foreign return” madams and sirs who gave the virus to the maids …. and not the other way around! https://t.co/XTc381MfWD
— Faye DSouza (@fayedsouza) May 26, 2020
I wrote to Mr. Mahesh Gupta, CMD of @KentROSystems last evening, requesting him to take this ad. down. Today an official statement of apology has been issued, a copy of which I just received. We all make mistakes, but few own up to it. @ndcnn @thesatbir @beastoftraal @SandipGhose pic.twitter.com/4wL0VrP3aa
— sanjay sarma (@NickSarma) May 27, 2020