Deepika Padukone – सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती मेघना गुलजार सध्या तिच्या आगामी ‘साम बहादूर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विक्की कौशलच्या चित्रपटाची थेट स्पर्धा रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’शी होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोक विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
विकी कौशल आणि दिग्दर्शक मेघना गुलजार त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. आता नुकतेच मेघना गुलजारने ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाण्यावरून झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या JNU भेटीचा परिणाम तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर झाल्याचे मेघना गुलजारने मान्य केले आहे.
मेघना गुलजार म्हणाली, ‘मला खात्री आहे की, माझे उत्तर पूर्णपणे स्पष्ट आहे. अर्थातच दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचा चित्रपटावर परिणाम झाला. कारण संभाषण अॅसिड हिंसाचारापासून दूर गेले आणि दुसरीकडे कुठेतरी गेले, जे मला चित्रपटात वाढवायचे होते. त्यामुळे साहजिकच त्याचा चित्रपटावर परिणाम झाला. यात शंका नाही.’
2020 मध्ये दीपिका पदुकोण तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली होती. त्याच वेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) तिने भेट दिली. जेएनयूमधील विद्यार्थी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी दीपिकाच्या जेएनयू भेटीवर जोरदार टीका झाली होती. याचा परिणाम ‘छपाक’ चित्रपटाच्या कमाईवरही दिसून आला.
50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 55.44 कोटींची कमाई केली. ‘छपाक’ चे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मॅसी दिसला होता.