पुणे – विविध योजनांच्या प्रसार आणि प्रचारासाठी केंद्रशासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे, जनजागृती, प्रसार, नवीन लाभार्थी नोंदणी तसेच संवाद साधून तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अंतर्गत पुणे महापालिकेवर या संकल्प यात्रेची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही मोहीम दि. २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. एका बाजूला दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने सर्वसामान्यांसाठीच्या पालिकेच्या योजनांचा गोंधळ उडालेला आहे.
त्यात आता महापालिका लोकसभेच्या आचारसंहितेपर्यंत केंद्राच्या योजनांचा प्रसार करणार आहे. या योजनेचा शुभारंभ कसबा गणपती येथे करण्यात येणार आहे. या अंतर्गत केंद्रशासनाने यासाठी केंद्रशासनाने मोबाइल थिएटर व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. शहरात दोन महिन्यांत १२५ ठिकाणी ही व्हॅन योजनांचा प्रचार करणार आहे.
या योजनांचा होणार प्रसार
१ ) पीएम स्वनिधी शिबिर
२) आयुष्मान भारत योजना शिबिर
३ ) आरोग्य शिबिर
४ ) आधार अपडेट शिबिर
५ ) प्रधानमंत्री उज्वला गॅस शिबिर