तळेगाव ढमढेरे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे दोन्ही गट अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तसेच आगामी येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची बांधणीस वेग आला आहे.
तळेगाव ढमढेरे येथे अजित पवार गटाच्या राष्टवादी काँगेस पक्षाची गावमहिला शाखा स्थापन करण्यात आली असल्याचे शिरूर तालुका महिलाध्यक्षा आरती भुजबळ यांनी सांगितले. आरती भुजबळ यांनी तालुका महिलाध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारताच पक्षाची महिला कार्यकारणी भक्कम करण्यासाठी गाव तिथे शाखा हे धोरण ठेवून तळेगाव ढमढेरेची पहिली महिला कार्यकारिणी निर्माण केली.
यामध्ये तालुकास्तरीय निवडीत उपाध्यक्ष म्हणून उल्का नरके, सरचिटणीस सुवर्णा भुजबळ, गीता येमूल, शिरूर युवती कार्यकारणीत मोनाली जकाते, प्रिया ढमढेरे, तृप्ती नरके यांची निवड करण्यात आली.
तर तळेगाव ढमढेरे गाव तिथे शाखेच्या अध्यक्षपदी सविता भुजबळ, उपाध्यक्ष सोनाली मायने, सदस्य आशा भुजबळ, नयना भुजबळ, अनिता मोरे, कविता भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकारी यांना महिलाध्यक्षा पंचायत समिती माजी सभापती आरती भुजबळ व युवती तालुकाध्यक्षा तदनिका कर्डीले यांनी नियुक्ती पत्र दिले.