पिंपरी – दुकानात येऊन दोन हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तृतीयपंथीयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खंडे वस्ती, भोसरी येथे शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी घडली.
याबाबत महिला फिर्यादीने शुक्रवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला फिर्यादी यांचे खंडे वस्ती, भोसरी येथे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तृतीयपंथी त्यांच्या दुकानात आला. त्यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी दुकानात होती. त्याने फिर्यादी महिला यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या तृतीयपंथ्याने “तुझे हातपाय तोडेल’ अशी धमकी दिली. तसेच मुलीला शिवीगाळ करून दुकानासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून टाळ्या वाजवल्या