fighter movie : अभिनेता हृतिक रोशन ( hrithik roshan ), अभिनेत्री दीपिका पदुकोण ( deepika padukone ) आणि अभिनेते अनिल कपूर स्टारर भारतातील सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ ( fighter movie ) बद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. आता ‘फाइटर’ ( fighter movie ) चित्रपटातील अभिनेता हृतिक रोशनचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामुळे चाहते खूपच खुश झाले आहेत.
सिनेमात अभिनेता स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानियाची भूमिका साकारत आहे, ज्याला त्याच्या कॉल साइन ‘पॅटी’ ने ओळखले जाते. हे पोस्टर शेअर करताना पॅटी उर्फ स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाने कॅप्शनमध्ये लिहिले, “स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया, कॉल साइन: पॅटी, पद: स्क्वाड्रन, पायलट, युनिट: एअर ड्रॅगन, फायटर फॉरएव्हर…”
Squadron Leader Shamsher Pathania
Call Sign: Patty
Designation: Squadron Pilot
Unit: Air DragonsFighter Forever 🇮🇳#Fighter #FighterOn25thJan #FighterMovie pic.twitter.com/os5XkTD3hS
— Hrithik Roshan (@iHrithik) December 4, 2023
चित्रपटाचे दिग्दर्शन हिटमेकर सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’मध्ये एकत्र काम केले आहे.
तसेच, विशाल-शेखर जोडी चित्रपटासाठी गाणी आणि मूळ गाणी तयार करत आहेत. एरियल अॅक्शन फिल्म 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.