पुणे – मराठा आरक्षणाबाबत राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागांत पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सलग चौथ्या दिवशी मराठवाडा, विदर्भातील काही भागांसह सोलापूर, पंढरपूर या मार्गांवरील बस पुण्यातच उभ्या राहिल्या. शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकातून सुटणाऱ्या या बस रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पुण्यातून दररोज 1 हजार 556 नियोजित बस फेऱ्या आहेत. त्यामध्ये बुधवारी (दि. 1) आंदोलनामुळे 770 फेऱ्या रद्द झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बीडसह अमरावती, नागपूर, सोलापूर मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे एसटी महामंडळाने दिली.
महत्त्वाचे मुद्दे…
- सुटणाऱ्या नियोजित फेऱ्या – 1 हजार 556
- आंदोलनामुळे रद्द झालेल्या फेऱ्या – 770
- आर्थिक नुकसान – 40 लाख 27841 रु.