पुणे -“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. समाजाची भावना आणि गरज लक्षात घेता मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे,’ अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष दीपक मानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही शासनास पत्र पाठवून तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
“मराठा आरक्षणाच्या लढ्याची व्याप्ती आणि आताची सामाजिक परिस्थिती पाहता, समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे. मराठा समाजाच्या या लढ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर शाखेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे.” – दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)
“मराठा बांधवांचा मुख्य व्यवसाय हा शेती असून, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हा अल्पभूधारक आहे. मराठा बांधवास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन मराठा बांधवाचा आरक्षण प्रश्न तत्काळ मार्गी लावावा.”- जगदीश मुळीक, माजी आमदार, भाजप