पुणे – आजारपणाला कंटाळून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश हेमंत गोरे (वय ६९) व वैशाली हेमंत गोरे (रा. ए ४ गंगा विष्णू संकूल, कर्वेनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.