वाघळवाडी – कौटुंबिक वादातून मुलाने पित्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून स्वत:वरही गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रूक येथे रविवारी (दि. २९) घडली. या घटनेत वडील गंभीर जखमी झाले आहेत.
को-हाळे बुद्रूक येथील शेतात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. कौटुंबिक व संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
वडिलांवर पिस्तुलातून गोळी झाडल्यानंतर मुलानेही स्वतःवरही गोळी झाडून घेतली आहे. दोघांना बारामतीत उपचारासाठी हलवण्यात आले आहे.