पुणे – बालेवाडी येथून कोथरूडकडे गॅस भरण्यासाठी निघालेल्या पीएमपी बसचा रविवारी भीषण अपघात झाला. सुदैवाने या बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे जिवीत हानी झाली नाही. मात्र, ही बस समोरून चक्काचूर झाली आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही बस बालेवाडी डेपोची होती. बस क्रमांक – ए 62 ही बस पहाटे चार वाजता बालेवाडी हुन कोथरूड डेपोत गॅस भरण्यासाठी येत असतात. चांदणी चौकात पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी बसचे ब्रेक फेल होऊन बस प्लेयरवर जाऊन आदळली.
यावेळी बसमध्ये कोणीही नव्हते. बस चालक गणेश काळे (बॅच क्रमांक- एएन 295) यांनी या अपघाताची रात्री उशीरापर्यंत कोणतीही माहिती पीएमपीच्या अपघात विभागाला दिली नाही. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकार्यांनी अपघात विभागातील माणसे पाठवून याची सविस्तर माहिती घेतली.
त्यानुसार ही बस पीएमपीच्या मे.अँटोनी या खासगी ठेकेदार असल्याची माहिती मिळाली. बस घटनास्थळावरून हटविण्यात आली असून, येथील रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे.