नवी दिल्ली – पुढील वर्षी जानेवारीत श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यापूर्वी 2020 च्या तुलनेत अयोध्येतील जमिनीच्या किमती 20 पटीने वाढल्या आहेत. एका आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीने अयोध्येतील निवासी प्रकल्पासाठी बुकिंग सुरू केले आहे.
1250 चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत दीड कोटी रुपये आहे. या कंपनीने ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये टाऊनशिप बांधण्यासाठी 1800 कोटी रु. करार केला आहे. या कंपनीच्या एका अधिकाऱ्यानुसार, या प्रीलॉंच बुकिंगमध्ये बहुतांश मालमत्ता खरेदी करणाऱ्यांमध्ये अनिवासी भारतीय आहेत.
मुद्रांक आणि नोंदणी डेटानुसार, 2018 ते 2022 दरम्यान मालमत्ता रजिस्ट्री चार पटीने वाढली आहे. 2018 मध्ये येथे 6 हजार रजिस्ट्री झाल्या होत्या. 2022 मध्ये 24 हजार रजिस्ट्री झाल्या आहेत. मालमत्ता व्यावसायिक उमेश सिंग यांच्यानुसार, रिंगरोडच्या आसपासच्या जागेचे भाव झपाट्याने वाढले आहेत. येथे बाहेरून लोक जमीन खरेदीसाठी चौकशी करत आहेत.
दुसरीकडे, अयोध्येत 32 हजार कोटींच्या विकास योजनांवर काम सुरू आहे. यूपी पर्यटन विभाग 42 मोठ्या हॉटेल्स आणि रिसॉर्टसच्या प्रस्तावांना अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. अयोध्येचा वेगाने विकास होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे, असे पर्यटन विभागाचे महासंचालक मुकेश मेश्राम यांनी म्हटले आहे.