लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गहू मळणीची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, मळणी यंत्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पूर्व भागात मागील काही वर्षापासून गहू पीक उत्पादन कमी करून शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे.
त्यामुळे गव्हाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात गव्हाचे पीक घेतले आहे. मात्र सध्या बंदीमुळे हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने अनेक शेतकरी गहू कापणी करून मळणी यंत्राच्या साह्याने मळणी करीत आहेत.