खेड शिवापूर – खेड-शिवापूर परिसरात गुरुवारी (दि. 30) वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास जोरदार पाउस झाला. या अवकाळी पावसाने आंबा आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा होता.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. परिसरातील खेड-शिवापूर, श्रीरामनगर, गाउडदरा या गावांना पावसाने झोडपून काढले. या भागात सध्या कांदा काढणी सुरू आहे. त्यामुळे या पावसामुळे कांदा भिजला आहे. तसेच आंबा पिकांचेही नुकसान झाले आहे.