सासवड -दिवे (ता पुरंदर) येथील शेतकऱ्याने सावकारच्या त्रासला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र मुलाच्या प्रसंगवधामुळे शेतकऱ्याच्या जीव वाचला आहे. दरम्यान, डिसेंबरमध्येच सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तसा तपास सुरू आहे.
मारुती रामंचंद्र अवताडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. शंकर सोपान टिळेकर (वय 46, रा. दिवे) असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या तथा फिर्यादीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, कर्करोगाच्या दुर्गम आजारासाठी टिळेकर यांनी 9 जानेवारी 2019 एओजी अवताडेकडून पाच लाख रुपये कर्ज घेतले होते.
त्यानंतर आणखी पैशांची आवश्यकता असल्याने अवताडेकडून 10 लाख रुपये घेतले होते. ते 5 टक्के सावकारी व्याजाने दिले होते. त्यासाठी तारण म्हणून 15 गुंठे जमिनीचे खरेदीखत करून अवताडेला दिले; परंतु आम्हाला न सांगता त्याने ती जमीन लहुजी गंगाराम भापकर यांना खरेदी खताने देऊन फसवणूक केली आहे.
जमिनीबाबत विचारणा केली असता फिर्यादि आणि त्यांच्या मुलास अवताडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने टिळेकर घाबरून मानसिक तणावाखाली त्यांनी तणनाशक औषध प्राशन केले होते ही बाबत मुलगा दिगंबर टिळेकरच्या लक्षात येतात त्यांनी शंकर टिळेकर यांना लागलीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीवर वाचला असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्या जवळील आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी पत्रा लिहिले होते त्यानुसार तपास करणार असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. पण वारंवार धमकी दिल्याचे पत्रात नमूद केले असले तरी त्याबाबत डिसेंबरनंतर एकही तक्रार फिर्यादिने यापूर्वी नोंदवलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.