वृत्तसंस्था – जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. करोना महामाहीमुळे लाखो लोकांचा जीव गेला असून. अनेकांना करोना विषाणूची लागण होऊन गेली आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही करोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली असून याआधी कुत्रे, मांजर व वाघ अशा प्राण्यांना करोनाची लागण होऊन गेली आहे. असे असताना आता हरिणही करोनाची शिकार झाली आहे.
अमेरिकेत एका हरिणाला करोनाची लागण झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. येथील ओहियो राज्य करोनाची लागण झालेले हरिण मिळाले असून याबाबत कृषी खात्याने दुजोरा दिला आहे. मात्र या हरिणाला करोनाची लागण कशी झाले हे अद्याप कळू शकले नाही.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पांढरी शेपटी असणाऱ्या हरिणाला SARS-CoV-2 चे संक्रमण झाले असून ते करोनामुळे झाले आहे. कृषी विभागाचे प्रवक्ते लेंडसे कोल यांनी माहिती देताना सांगितले की, या हरिणास करोनाची लागण कशी झाली हे अद्याप आम्हाला कळू शकले नाही.