मुंबई – अभिनेत्री करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. करीनाची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. मात्र, काही वेळा फोटो काढण्याच्या वेळी असे काही घडते, ज्यामुळे स्टार्स बदनाम होतात.
View this post on Instagram
सोशल असाच एक व्हिडिओ करिनाचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला करिनाशी हाथ मिळविण्याचा प्रयत्न करते मात्र, करीना तिच्या चाहतीकडे दूर लक्ष करते आणि तेथून निघून जाते. यादरम्यानचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये करीनाने मुद्दाम महिलेशी हाथ मिळवला नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे काही लोकांना वाटत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बहुतेक लोक करिनाला ट्रोल करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, “इतका पैसा आणि प्रसिद्धीचा काय उपयोग की कोणाचाही अनादर
करू नये”.
करीना कपूरच्या वर्क फ्रंटवर, ती लाल सिंग चड्ढामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. येत्या काळात करीना कपूर तख्त, वीरे दी वेडिंग २, द क्रू या चित्रपटात दिसणार आहे.