मुंबई – बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर राज करतात. या यादीत फुकरे येतो. या चित्रपटाचे दोन भाग आले असून प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंगची बातमी समोर आल्या होत्या. आता या चित्रपटाशी संबंधित नवीन बातमी समोर आली आहे,
निर्मात्यांनी फुक्रे 3 च्या रिलीजची तारीख वाढवली आहे. फुक्रे ३ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या वर्षी जानेवारीमध्येच चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की, या हिट कॉमेडी फ्रँचायझीचा तिसरा भाग 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होईल. पण आता 24 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरू आहे.
पुलकित सम्राट आणि रिचा चढ्ढा यांची दमदार जोडी ‘फुक्रे ३’ मध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे. मनजोत सिंग आणि वरुण शर्मा यांच्या फुकरे या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. लोकांना हे चित्रपट खूप आवडले. आता चित्रपटाचा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहावे लागेल.