मुंबई – अभिनेत्री रवीना टंडनच्या लेकीने अजून इंडस्ट्रीत पाऊलही ठेवलेले नाही आणि ती सगळीकडे गाजली आहे. राशा ही सोशल मीडिया स्टार आहे. राशा आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
View this post on Instagram
राशा अभिषेक कपूरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात अजय देवगणचा भाचा अमन देवगण त्याच्यासोबत दिसणार आहे. आपला अभिनय दाखवण्यापूर्वी राशाने तिच्या सिंगिग स्किलने चाहत्यांची मने जिंकली आहे. चाहते तिच्या आवाजाने वेडे झाले आहे. राशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाणे गाताना दिसत आहे.
जागतिक संगीत दिनानिमित्त राशाने तिच्या स्टेज परफॉर्मन्सपैकी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वैलेरी हे गाणे अतिशय हळुवार आवाजात गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राशा ब्लॅक शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने मॅचिंग बूट कॅरी केले आहेत.
रिपोर्ट्सनुसार राशा वयाच्या ६ व्या वर्षापासून संगीत शिकत आहे. उस्ताद कादिर मुस्तफा यांच्याकडून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. यासोबतच राशाने शंकर महादेवन यांच्या अकादमीतून कोर्सही केला आहे. राशा आणि तिची को-स्टार काही दिवसांपूर्वी लंचमध्ये स्पॉट झाली होती. अभिषेक कपूरच्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. या चित्रपटात राशा आणि अमनसोबत डायना पेंटी देखील दिसणार आहे.