मुंबई – लोकप्रिय मल्याळम अभिनेता “विजय बाबू’ बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. एका अभिनेत्रीने विजय विरोधात हा गुन्हा दाखल केला असून, विजयनं देखील या प्रकरणावर आपलं व्यक्त केलं आहे. ही बातमी समोर येताच सर्वानांच धक्का बसला आहे.
विजय बाबू हा अभिनेत्यासोबतच एक निर्माता आणि उद्योजक देखील आहे. कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, विजयने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपण सुद्धा या अभिनेत्रीच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
‘मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही.’ असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.