पुणे : किरकोळ कारणावरुन जाब विचारणाऱ्या डॉक्टरावर हल्ला करुन डोळे काढण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आरोपींना याप्रकरणी हडपसर पोलीसानी अटक केली आहे. योगेश हाणमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड असे अटक आरोपींचे नाव आहेत.
शनिवारी पुणे विमानतळावर बहिणीला सोडवून सतिश वानखेडे आणि अक्षय जाधव हे आपल्या दुचाकीवरून हडपसरकडे होते. यावेळी आचानक एक कार अंगावर आल्याने वानखेडे यांनी कारमध्ये बसलेल्याना जाब विचारला.
वानखेडे यांचा राग आल्याने कारमधील चौघांनी दुचाकींचा पाठलाग केला. दुचाकीला गाडी आडवी करत चौघांनी सतिश वानखेडे यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने सतिश वानखेडे यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होता. मात्र 24 तासांच्या आत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.