पुणे – केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या दि. 1 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत विद्यापीठाला व संलग्न महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरातून कामे करावीत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर, विद्यार्थ्यांनी ई-लर्निंग यंत्रणेद्वारे अभ्यास करण्याचेही आदेशीत करण्यात आले आहे.