मुबई – खेसारी लाल यादव यांच्या ‘संघर्ष 2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. खेसारी लालची दमदार ऍक्शन स्टाइल चित्रपटात पाहायला मिळत आहे. यासोबतच त्याचा चित्रपटातील लूकही खूप वेगळा आहे. ‘संघर्ष 2’च्या ट्रेलरमध्ये जिथे दमदार ऍक्शन आहे, तिथे परदेशी लोकेशन्स आणि टॉप क्लास मारधाड पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देशभक्तीची भावना देखील असल्याचे दिसत असून चित्रपटाची कथा एका गेम भोवती फिरत असल्याचे दिसते. एवढेच नाही तर ट्रेलरमध्ये लहान मुलांच्या गेमिंग खेळण्याबाबत देखील भाष्य करण्यात आले आहे.
‘संघर्ष 2’ च्या ट्रेलरमध्ये माही श्रीवास्तव, संजय पांडे आणि सुशील सिंह देखील दिसत आहेत. ट्रेलरमध्ये मेघश्रीने खेसारी लाल यादव यांच्या पत्नीची भूमिका साकारल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच खेसरीची खऱ्या आयुष्यातील मुलगी क्रिती यादवही ट्रेलरमध्ये दिसत आहे, जी भारत हा जमिनीचा तुकडा नसून एक जिवंत राष्ट्र असल्याचे सांगते.