राजगुरुनगर -राजगुरुनगर मेडिकल असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 2020-2021 या कालावधीसाठी कार्यकारिणी नुकतीच एकमताने निवडण्यात आल्याची माहिती, डॉ. प्रदीप शेवाळे यांनी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेंद्र तुपे म्हणाले की, राजगुरुनगर शहरात डॉक्टरांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन केला जाईल. असोशिएशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
राजगुरूनगरची नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष : डॉ. राजेंद्र तुपे, उपाध्यक्ष : डॉ. ऋषीकेश ठोंबरे, सचिव : डॉ. ओंकार काजळे, सहसचिव : डॉ. हरेश जगताप, खजिनदार : डॉ अविनाश फाटक.