राजगुरूनगर, दि. 23 (प्रतिनिधी) -राजगुरूनगर बार असोसिएशनची कार्यकारिणीची निवडणूक सोमवारी (दि. 22) सर्वानुमते बिनविरोध पार पडली. बार असोसिएशनचे अध्यक्ष, लोकल ऑडिटर, खजिनदार पदाची निवडणूक मार्च महिन्यात बिनविरोध निवड झाली होती.
उर्वरित जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता; मात्र करोना संसर्ग सुरू झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली होती. ती सोमवारी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. नामदेव वाडेकर, ऍड. स्वाती आचार्य, ऍड. अतिक सय्यद, ऍड. संदीप घुले, ऍड. रश्मी वाघुले, ऍड. किरण दौंडकर यांनी काम पाहिले.
निवडीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. पोपटराव तांबे, ऍड. बी. एम. सांडभोर, माजी अध्यक्ष ऍड. अरुण मुळूक, ऍड. सुभाष कड, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, ऍड. वैभव कर्वे, ऍड. आशा करमरकर, ऍड. अनिल बोंबले, ऍड. मनीषा टाकळकर, ऍड. विजय भगत, ऍड. विक्रम कड यांच्यासह सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील सभासद याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
अध्यक्ष : ऍड. संजय पानमंद, उपाध्यक्ष : ऍड. प्रफुल्ल गाढवे, ऍड. अतुल ऊर्फ प्रदीप गोरडे, सचिव : ऍड. कालिदास दौंडकर, ऍड. शीतल बडदे, खजिनदार : ऍड. शंकर कोबल, लोकल ऑडिटर : ऍड. योगेश मोहिते, सदस्य : ऍड. प्रीतम गारगोटे, ऍड. शुभांगी डुबे, ऍड. अजय पडवळ, ऍड. अमोल तळेकर. संघटनेच्या सर्व सदस्य सहकाऱ्यांसोबत वकिलांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. तालुक्यात कामगार न्यायालय, मोटार अपघात व ग्राहक न्यायालय व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. पक्षकार आणि वकील बांधवांसाठी न्यायालयात सेवा सुविधा उपलब्ध करून देवू. कनिष्ठ वकील बांधवांसाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील. न्यायालयासाठी नवीन इमारत निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– ऍड. संजय पानमंद,
नवनिर्वाचित अध्यक्ष, राजगुरूनगर बार असोसिएशन