नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत-चीन दरम्यान तणावाचे वातावरण आहे. अशातच रशियाने अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी आश्वासन दिले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले कि, माझी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध कोरोनासारख्या संकटानंतरही दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. त्याचबरोबर बऱ्याच बाबींमध्ये ही कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
दरम्यान, रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये, असे मत चीन सरकारचे मुखपत्र पीपल्स डेलीने व्यक्त केले होते.